सूचना: प. पु. स. रमणनाथ महाराज संजीवन समाधी ट्रस्ट सूचना

प.पु.स. रमणनाथजी महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था

सदर संस्था हि सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे

  • सर्व जाती-धर्माच्या मुलांवर अध्यात्मिक संस्कार करण्यासाठी गुरुकुल शिक्षण  पद्धतीचा अवलंब करीत आहे.
  • दयनीय स्थितीच्या कारणास्तव शिक्षणाचा अभाव असणाऱ्या लोकांमध्ये शिक्षणाची जाणीव करून देऊन अश्या मुलांना, शिक्षणासोबत अन्न, वस्त्र, निवारा,  शैक्षणिक साधनसामुग्री, दैनंदिन गरजेच्या वस्तूंची सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • लहान बालकांपासून प्रौढ व्यक्ती पर्यंतच्या सर्वाना ज्ञानदान देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडविण्याचे महान कार्य करीत आहे .
  • आजची लहान मुले हि भावी जीवनात देशाच्या प्रगतीचे नागरिक आहेत या संकल्पनेला धरून मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कधी कुंभाराची तर कधी माळ्याची भूमिका स्वीकारून त्यांच्या अंगी दक्षता, जागरुकता, तत्परता, दूरदर्शीपणा, नेतृत्व, योग्य –अयोग्यची पारख, आकलनक्षमता, ध्येय, वर्तन, संस्कार, शिस्त इत्यादी गुणांचा विकास करीत आहे .
  • ज्ञानदानाच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहे. 
  • सामाजिक वसा घेऊन समाजासाठी, गोर गरीब व गरजू लोकांना मोफत अन्नधान्य वाटप, पर्यावरणाविषयक जाणीव – जागृती म्हणून वृक्षारोपण करणे, मोफत वैद्यकीय तपासणी करणे, रक्तदान शिबिरे असे विविध उपक्रम सातत्याने राबवित आहे.
  • दुर्लब व गरीब नागरिकांसाठी गरजेच्या सुविधा पुरवित आहे.