सूचना: प. पु. स. रमणनाथ महाराज संजीवन समाधी ट्रस्ट सूचना

मठाविषयी माहिती

श्री क्षेत्र दत्तधाम प्रती गाणगापूर


प्रती गाणगापूर क्षेत्र हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या निसर्गरम्य अश्या तानसा तलावाच्या किनाऱ्यावर आहे. दत्त महाराजांचे सर्वात लाडके शिष्य प.पु.स. रमणनाथजी महाराज यांचे हे स्थान होय. या भूतलावर विश्वकल्याणासाठी तसेच दत्त संप्रदायाच्या प्रसार कार्यासाठी ज्या २४ सिद्ध अनुयायी शक्तींचा अवतार झाला त्यापैकी रमणनाथजी महाराज हे सतरावे अनुयायी होय. या महात्म्याच्या तप सामर्थ्याची दाट वलयं इथे रेंगाळल्याची अनुभूती ह्या भूमीवर पाऊल ठेवता क्षणी येते. अश्या या तपोभूमीत पाऊल टाकल्याबरोबरच मन प्रफुल्लीत होते. मनावरचं काळजीचं, चिंतेचं, निराशेचे, दुःखाचे ओझं कधी गळून पडतं ते समजत सुद्धा नाही, आणि मग मन हलकं हलकं होऊन तरंगावयास लागतं. म्हणूनच ह्या क्षेत्री येणारा प्रत्येकजन हा त्या वलयांच्या फेऱ्यात आल्याबरोबर आपोआप शांत, आनंदी आणि विनम्र होतो.

ह्याच भूमीत प.पु.स.रमणनाथजी महाराजांचे जीवन कार्य अर्थात तपसाधना संपन्न झाले, आणि ह्याच भूमीच्या पोटात इसवी सन १७३५ मध्ये संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणी घेतलेली समाधी. ह्या महात्म्याने आपल्या ११० वर्षाच्या साधनेतून मिळालेल्या शक्तीतून जीवब्रम्ह सेवेचे व्रत जन्मभर गिरवल आणि हेच कार्य इतक्या वर्षांनंतरही आजतागायत गुप्त रूपांनी चालू आहे. पूज्य महाराजांच्या ह्या समाधीच्या डाव्या बाजूला कुटीया आहे. या कुटीयाच्या मध्यभागी धुनी आहे, ती चेतन असून दत्तात्रेयांचा तेथे अखंड स्वरूपातील वास आहे. दत्तगुरूमाउलीच्या आशीर्वादाने धुनीतील यज्ञचैतन्याच्या प्रकाशाचा ज्ञान आत्मसात करून हे ज्ञान भक्तांपर्यंत पोहचावे म्हणून याच धुनीजवळ कठोर अशी साधना करून प.पु.स.रमणनाथजी महाराजांनी दत्तगुरूमाउलींची, मेघ देवतेची, गो मातेची अशी अनेक देवतांची पदे रचून त्यांना प्रसन्न केले.


नित्य दिनक्रम

  • आसनाची वेळ सकाळी ३ ते ४
  • काकड आरती सकाळी ४ ते ४.३०
  • नित्य अभिषेक सकाळी ४.३० ते ६
  • मूर्तीची आरस सकाळी ६.०० ते ६.४५
  • आरती सकाळी ७.००
  • दुपारचा नैवेद्य दुपारी ११.४५
  • मध्यान आरती दुपारी १२.०० ते १२.३०
  • संध्या आरस संध्या. ५.०० ते ६.००
  • संध्या आरस संध्या. ५.०० ते ६.००
  • हवन संध्या. ७.०० ते ७.४५
  • रात्रीचा नैवेद्य रात्री ७.४५ ते ८.००
  • आरती रात्री ८.०० ते ८.४५