सूचना: प. पु. स. रमणनाथ महाराज संजीवन समाधी ट्रस्ट सूचना

प.पु.स.रमणनाथजी महाराज संजीवन समाधी ट्रस्ट

सदर संस्था हि अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहे 

  • या ट्रस्टचे अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य हे प.पु. सदगुरू रमणनाथ महाराजांचे जीवन म्हणजे एक खुले पाठ्यपुस्तक होय या संकल्पनेला धरून महाराजांनी जोपासलेला अध्यात्म मार्ग नजरेसमोर ठेऊन करीत आहे. 
  • शिष्य तथा भक्त वर्गास धार्मिक शिक्षण देऊन त्यांच्याकडून अध्यात्मिक सेवा कार्य करून घेते.
  • जनमाणसांमध्ये भक्तीची, नीती धर्माची ज्ञानज्योत तेवत ठेऊन समाज अध्यात्मिक  संस्कारांनी घडवित आहे .
  • पारमार्थिक संस्कार घडून सदगुरू ज्ञान बोधाच्या माध्यमातून लोकांचे आत्मकल्याण साधत आहे.
  • चांगल्या निरपेक्ष वृत्तीने सेवाभावाने या जगात वावरता येते  अशी शिकवणूक  भक्त तथा सेवक वर्गाला देऊन समाज प्रबोधनाचे कार्य करून ट्रस्टच्या सेवाकार्यामध्ये कार्यरत असणारा सेवक वर्ग हा सेवेला आपला जीवनधर्म मानूनच कार्य करतो.
  • समाजात अध्यात्मिक सेवाकार्य अत्यंत महत्वपूर्ण असून याद्वारे धर्म, संस्कृती व अध्यात्म यांचे जतन करण्यासाठी दत्त संप्रदायाचा प्रसार  करण्यास्तव ग्रंथ, भजने,कीर्तने इत्यादी कार्याद्वारे प्रचार करून असंख्य लोकांना भक्तीचा आनंद देत आहे.
  • ध्यान धारणेद्वारे आत्म्याला शुद्धता देणे, आत्म्याची शुद्धता अनुभवणे त्याच्या सभोवतीची परिस्थिती स्वच्छ पवित्र व पुनीत करणे अर्थात जीवनविद्या, अध्यात्मिक विद्या इत्यादी ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपले जीवन निश्चितच सुखी करू शकतो याची मनुष्यास जाणीव करून देत आहे.
  • या अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यामध्ये माणसाने माणसांशी माणसांसारखे वागणे, आपल्यामुळे कुठल्याही जीवाला त्रास होऊ नये, निस्वार्थ सेवाभाव ठेवणे, साधे, सोपे, सरळ, निर्मळ असणे, दिसणे आणि वागणे तसेच केलेली पूजा, अर्चना, प्रार्थना किंवा भक्ती याप्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे इत्यादीची शिकवण देत आहे.